Home गडचिरोली मा.पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद...

मा.पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसैनिक एकवटले..

103

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0091.jpg

मा.पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसैनिक एकवटले..   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शेकडो शिवसैनिकांनी स्टॅंपपेपर द्वारे समर्थन लिहून देत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांना केले सुपूर्द केले

हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही कट्टर शिवसैनिकांची शिवसेना आहे. शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झाला असून कितीही संकटे आली तरी आम्ही डगमगणार नाही. गडचिरोली जिल्हयातील आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आधारवड समर्थन गडचिरोली येथील शिवसैनिकांनी शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांना स्टॅम्प पेपरद्वारे लिहून दिले.शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसैनिक एकवटले. मा.उध्दव साहेब गडचिरोली येथील आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहोत असे समर्थन स्टॅंपपेपर द्वारे लिहून देत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांना सुपूर्द केले.शिवसेनेत बंडखोरी झाल्याने पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंडखोरांमुळे पक्षावर संकट आले असतांनाही राज्यातील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.गडचिरोली येथील शिवसैनिकांनी सुध्दा पक्षाप्रती असलेली निष्ठा दाखवून देण्यासाठी स्टॅम्प पेपरद्वारे समर्थन जाहीर केले. आम्ही मा.बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून कोणत्याही भुलथापांना बळी पडणार नाही. गडचिरोली जिल्हयात शिवसेना अधीक मजबुत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक महत्वपुर्ण योगदान देईल, असा मनोदय शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार,सह संपर्क प्रमुख विलास कोडापे,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,नवनाथ ऊके,संजय बोबाटे,नानाजी काळबाधे,संदीप भुरसे,सुरज उइके,संदीप अलबनकर,निरंजन लोहबरे,स्वप्निल खांडरे,निकेश लोहबरे,राजू जवादे,अरुण बारापात्रे,हरबा दाजगये, सुमित सोनटक्के,तनबा दजगये,गोपाल मोगरकर, रमजी भांडेकर,उमाजी शिवनकर,नेताजी आलम,शालिक कोवाची,सचिन निलेकर,दिलीप वलादे, निकेश मड़ावी,रविंद्र मिसार,गोपाल पानसे, महेश झोड़े,रामचंद्र बह्यल,अमित हुलके,सचिन सेलोते,सूरज टेकाम,राहुल मड़ावी,अभिषेक सेलोते,आशीष शेडमाके,सूरज शेंडे,समीर गड़पायले, रमेश आकरे,अरविंद भांडेकर,यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी उपस्थित होते

Previous articleधानोरा येथील तालुका क्रिडा संकुल लवकरच होणार आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleभाजपा महिला मोर्चा तर्फे गडचिरोली साई मंदिरात”राखी मेकिंग व निबंध स्पर्धा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.