
आशाताई बच्छाव
राष्ट्रिय महामार्गावरील शिवनी नाल्यावरील पुलाची उंची वाढवा
आमदार डॉ देवरावजी होळी
नव्यानेच बांधलेल्या गोविंदपुर येथील नाल्यामुळे वारंवार वाहतूक बंद होणे दुर्दैवी गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गोविंदपुर नाल्यावरील पुलाची देखील उंची वाढवणे आवश्यक
विद्यमान परिस्थिती लक्षात घेता पुलाची उंची वाढविणे आवश्यक असतानाही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष
नुकत्याच नव्याने बांधलेल्या गडचिरोलीच्या चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपुर नाल्याजवळील पुलावर पावसामुळे पाणी येत असल्याने वारंवार बंद होणारी वाहतूक लक्षात घेता शिवनी येथे मंजूर असलेल्या पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गोविंदपुर नाल्यावरील पुलाच्या पाहणी प्रसंगी केले
यावर्षी सतत येणाऱ्या पावसामुळे व वैनगंगा नदीला येणाऱ्या दाबाच्या पाण्यामुळे गोविंदपूर नाल्याजवळ चामोर्शी -गडचिरोली मार्ग वारंवार बंद होत आहे.परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबत चाललेली आहे. या नाल्यावरील पुलाचा मागील वर्षांचा इतिहास लक्षात घेता नवीन पुलाची उंची वाढविणे आवश्यक होते. परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ज्या उंचीचे जुने पूल होते त्याच उंचीच्या नवीन पुलाचे बांधकाम केले. त्यामुळे या पुलावर सातत्याने पाणी येऊन वाहतूक थांबत आहे. त्यामुळे या पूलाची उंची वाढवणे आवश्यक आहे.
तसेच याच राष्ट्रीय महामार्गावर मंजूर असलेल्या व नव्याने होणाऱ्या शिवनी नाल्यावरील पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे. उंची न वाढवल्यास याही पुलावर वारंवार पाणी येऊन मार्ग बंद होत राहील व राष्ट्रीय महामार्गाचा काहीही लाभ जनतेला मिळणार नाही त्यामुळे याकडे गांभीर्याने बघून मंजूर असलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करून पूलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.