आशाताई बच्छाव
गावातील सरपंच सह गावकऱ्यांचे महावितरण कार्यालय समोर आमरण उपोषण
युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी:- रवि शिरस्कार ,संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील विधुत वितरण कंपनी विरोधात विविध मागण्यासाठी दि.1 आगस्ट रोजी सोनाळा सरपंच सह ग्रामस्थानी विद्युत वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोनाळा गावामधील वेळोवेळी तुटणाऱ्या विधुत तारा तात्काळ बदलाव्या,गावातील व शेतातील विधुत पुरवठा अखंडीत सुरू ठेवावा, शेतामध्ये रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाईनची व्यवस्था करावी, कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरावी व विद्युत पुरवठा दुरुस्त करण्यासाठी चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी ,रथाच्या मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा काढून त्या ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकण्यात यावेत ,गावातील रथ मार्गावरील झुकलेले पोल तात्काळ बदलण्यात यावे यासह विविध मागणीसाठी तक्रार दाखल करण्यात आली होती पण मात्र मार्गे न लागल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ह्यावेळी सरपंच राजेश विश्वकर्मा,रामदास पांडव,यासह इतर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.या संदर्भात विधुत वितरण विभागातील अधिकारी यांनी भेट दिली असता समस्यांवर निराकरण न झाल्यामुळे उपोषण सध्या सुरूच आहे.






