Home गडचिरोली पुरात मुतापूर जिप शाळेतील दस्तावेज भिजले..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार...

पुरात मुतापूर जिप शाळेतील दस्तावेज भिजले..!! माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट..!!

104

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0027.jpg

पुरात मुतापूर जिप शाळेतील दस्तावेज भिजले..!!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट..!!

सिरोंचा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पाऊस आणि मेडिगड्डा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर येऊन असरअल्ली येथून जवळच असलेल्या मुत्तापूर जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरून शाळेतील संपुर्ण दस्तऐवज पाण्यात भिजले आहेत.यामध्ये शाळेतील शालेय अभ्यासक्रमात वापरले जाणारे साहित्य आणि जुना रेकार्ड तसेच विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या विविध साहित्य आणि पुस्तक आणि इतर महत्वाचे कागदपत्रे भिजले असून माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार असरअल्ली परिसरातील पाण्याखाली आलेल्या जिप शाळेना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतल्या आहे.पाण्याखाली येऊन शाळेतील साहित्य खराब झाले असून शासनाला पाठपुरावा करून तत्काळ सदर शाळांना साहित्य पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असे यावेळी कंकडालवार यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले.पुरात तालुक्यातील अनेक शाळेचे इमारती पाण्याखाली बुडाले असून भविष्यात इमारती कोसळण्याची भीती नाकारता येत नसल्याने पाण्याखाली बुडालेल्या सर्व शाळेच्या इमारतीच्या पाहणी करून शाळेत विद्यार्थ्यांना बसविण्यात यावी अशी मागणी पालकांकडून होत आहे..!!

यावेळी माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,अविस अध्यक्ष बानय्या जनगाम,अविस जेष्ठ नेता शंकर मंदा,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, धर्माय्या कोठारी,उपसरपंच सल्ला मॅडम,माजी सभापती भास्कर तलांडी,माजी जिप सदस्य अजय नैताम,सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सूरज गावडे,माजी सरपंच दिलीप गंजीवार,नप सिरोंचा स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार,किरण वेमुला, संतोष भिमकरी,अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला,सतीश जवाजी,साई मंदा, गणेश राच्चावार, विजय तुमडे,संजय चिंताकन्नी,सागर कोठारी,समय्या तोरकरी, सुकदेव, महेश तोरकरी, स्वामी चप्पिडी,सडवली राजु गूडूरी,दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले,लक्ष्मण गावडे,कलाम शेख, विनोद भूपती, रमेश धर्मी,महेश तलांडी,संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Previous articleमा.उद्धवसाहेब………. गडचिरोलीतील समस्त शिवसैनिक तुमच्या पाठीशी…
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या सासवडला जाहिर सभा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.