Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्तांना जीवनावश्यक...

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

133

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0067.jpg

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने अहेरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

गडचिरोली,(सुरज गुंडमवार,ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार अभिजित वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी तालुक्यातील आलापल्ली, नागेपल्ली भागात पूरग्रस्त भागाची पाहणी करून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आम. व प्रदेश महासचिव अविनाश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आम. पेंटाराम तलांडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, आरमोरी चे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, अहेरी तालुका अध्यक्ष मुस्ताक हकीम, एटापल्ली ता.अ.संजय चरडूके, काँग्रेस नेते रमेश गंपावार, नगरसेवक निजान पेंदाम, मोहन नामेवार, रजाक खान, लोकेश गावडे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, सुधीर बांबोळे, जावेद खान, नगरसेविका तारा गावडे, अनिता कुमरे, खोब्रागडे मॅडम, सह मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आमदार अभिजित वंजारी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपस्थित नागरिकांच्या समस्या जानून घेतल्या व पुराणे नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून तत्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे आश्वासनही आमदार अभिजित वंजारी यांनी दिले.