Home नांदेड अंबुलगा येथील भूगर्भातील आवाजामुळे नागरिकात भीतीचे वातावरण.

अंबुलगा येथील भूगर्भातील आवाजामुळे नागरिकात भीतीचे वातावरण.

33
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220727-WA0044.jpg

अंबुलगा येथील भूगर्भातील आवाजामुळे नागरिकात भीतीचे वातावरण.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु) येथे दि .२७ रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान भूगर्भात एक अचानक आवाज होऊन जमिन व गावातील घरानां कंपनरुपी सौम्य धक्का जाणवला .सुदैवाने यात कोणतेही नुकसान अथवा जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.साधारण २९ वर्षापूर्वी १९९३ साली आंबुलगा (बु) परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. कंपनरुपी आवाजाची तीव्रता कमी असली तरी त्याचे कंपन जास्त होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .या संदर्भात अंबुलगा ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन कळविले आहे . यावेळी अंबुलगा सज्जाचे तलाठी जगन्नाथ वारकरे साहेब , सरपंच (प्र) बालाजी रॅपनवाड यांची उपस्थिती होती.

Previous articleजिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत
Next articleघरोघरी तिरंगा अभियानाचे आता उत्स्फूर्त लोकसहभागातून लोकचळवळीत रूपांतर. – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here