Home चंद्रपूर मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी ४ कोटी रू. निधी वितरित माजी अर्थमंत्री...

मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी ४ कोटी रू. निधी वितरित माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे यश

142
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0038.jpg

मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी ४ कोटी रू. निधी वितरित

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे यश

चंद्रपूर/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चंद्रपूर जिल्‍हयातील मुल येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठी ४ कोटी रु ऐवढे अनुदान राज्‍य शासनाने वितरित केले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्‍याने केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले असून राज्‍य शासनाच्‍या कृषी व पदुम विभागाने दिनांक २५ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकालात सदर कृषि महाविद्यालय मंजूर केले .त्यानंतर या कृषी महाविद्यालयाचे इमारत बांधकाम , वेतनेतर अनुदान आदी बाबी प्रलंबित होत्या. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक १० मार्च २०२२ रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करत मुल येथील कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी तसेच वेतनेतर अनुदानासाठी निधी मंजूर व्‍हावा अशी मागणी केली होती. त्‍यानुसार दिनांक १६ मार्च २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये सदर कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी ६४.५९ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. मात्र सदर कृषी महाविद्यालयाचे प्रलंबित वेतनेतर अनुदान मिळाले नव्‍हते. यासंदर्भात ६ जुलै २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर कृषी महाविद्यालयाच्‍या कामाला गती प्राप्‍त व्‍हावी यादृष्‍टीने उच्‍चस्‍तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत वेतनेतर अनुदानाचे १ कोटी ८० लक्ष रू. तातडीने वितरीत करण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या होत्‍या. त्यानुसार मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या वेतनेतर अनुदानासाठी १ कोटी ८० लक्ष रू. अनुदान वितरीत करण्‍यात आले आहे. आता २५ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार या कृषि महाविद्यालयासाठी ४ कोटी रु निधी वितरित करण्यात आला आहे.आ. मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी सदर कृषी महाविद्यालयाच्‍या एकुणच कामकाजाला या माध्‍यमातुन गती प्राप्‍त होणार आहे.

Previous articleकॅन्सरमुक्त महाराष्ट्र’ अभियान हे खऱ्या अर्थाने पुण्य कर्म : आ.सुधीर मुनगंटीवार भाजपाच्या जैन प्रकोष्ठ चे भरभरून कौतुक
Next articleदिभना येथे वाघाच्या हल्यात शेतकरी ठार।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here