Home नाशिक नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये पितृदिन (फादर्स डे ) उत्साहत...

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये पितृदिन (फादर्स डे ) उत्साहत साजरा

137

आशाताई बच्छाव

Screenshot_20220621-164840_WhatsApp.jpg

 

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये पितृदिन (फादर्स डे ) उत्साहत साजरा
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे युवा मराठा न्युज नेटवर्क
दिनांक 19 जून रोजी ‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेच्या कॅम्पस मध्ये “पितृदिन अर्थातच फादर्स डे ”
उत्साहात संपन्न झाला.
आज विद्यार्थ्यांच्या उपस्थित नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल मॕम ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॕम आणि लिटल स्टार इंग्लिश मेडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा मॕम यांनी उपस्थित पालक वर्गाचे स्वागत केले.तसेच यांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
नविन शैक्षणिक वर्षातील फादर्स डे हा पहिला प्रसंग असल्याकारणाने सर्वाना
ओढ लागलेली होती.काही कालावधीनंतर सर्व उपस्थित पालकांचे
स्वागत करण्यात आले.फादर्स डे चे औचित्य साधून पालकांनी गर्दी केली होती.पालकांच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.यानंतर सर्व मुलांनी आपआपल्या पालकांचे पाय धुवून त्यावर हळदी कुंकू वाहून चरण पूजन करण्यात आले.पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना शुभाशिर्वाद दिले.प्रत्येक मुलांनी आपल्या वडीलांसाठी सरप्राईज गिफ्ट आयोजित केले होते.व पालक व मुलांनी नृत्य सादर केले.मुलांचे गिफ्ट बघून पालक खूप खुश झाले. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांप्रती आणि शाळेप्रती अतिशय समर्पक शब्दांत प्रेम व्यक्त केले.

त्यानंतर सर्व उपस्थित पिता पालकांचे आणि मुलांचे संस्थेच्या
या वतीने आभार मानण्यात आले.आणि अशा पद्धतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका प्रिया गरूड मॕम ,रूपाली शिंदे मॕम ,एदना फर्नाडीस मॕम ,मोनाली गायकवाड मॕम ,जयश्री चौधरी मॕम, बावणे मॕम , ज्योती सुरसे मॕम , विजेता पिलके मॕम,मोहन सुरसे सर, अनिता जगधणे मॕम ,सुरेखा गायकवाड मॕम, तसेच मदतनिस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल,छाया आवारे, मंगेश शिंदे, विनोद चौधरी यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पाडला.

Previous articleनांदगाव तालुक्यात वडाळी या गावी घरातल्या किचन मध्ये आढळलं कोब्रा             
Next articleवाढदिवसातून सामाजिक कार्य एक अनमोल कार्य
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.