Home नांदेड विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करा.

विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करा.

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0062.jpg

विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करा.
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई, – मौजे असर्जन- कौठा येथे प्रस्तावित नांदेड जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिल्या.

नांदेड येथील विभागीय क्रीडा संकुलासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. आमदार अमर राजूरकर, क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बकोरिया (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी आर.एस. मारावार आदी यावेळी उपस्थित होते.

नांदेड-लातूर मार्गावर मौजे असर्जन कौठा हद्दीत नांदेड जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. २४ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या क्रीडा संकुलांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

नांदेड येथे हे विभागीय क्रीडा संकुल विशेष बाब म्हणून उभारण्यात येत असून या संकुलामुळे जलतरण, बॉक्सिंग, धनुष्यविद्या आदी क्रीडा प्रकारांच्या सुविधा ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत. या संकुलासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच संकुलाच्या आराखड्यात किरकोळ सुधारणा करण्याचे निर्देशही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि मुखेड येथील क्रीडा संकुलाच्या आराखड्याच्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या संदर्भाने या बैठकीत पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा घेतला.

Previous articleआत्मविश्वासाची पावले जेंव्हा शाळेत उमटतात
Next articleआषाढी एकादशी औचित्य साधुन महामंडळच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या धावणार 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here