आशाताई बच्छाव
महावितरणच्या भोंगळ कामहावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कासारवाडी येथील मुख्याध्यापक सतीश गुंड यांना आपला जीव गमवावा लागला
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro Mahadev Gholap
कासारवाडी येथील मुख्याध्यापक सतीश गुंड यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर मी महावितरणच्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासाठी ऊर्जा मंत्री मा. नितीन राऊत साहेब यांच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधला होता.
ऊर्जा मंत्र्यांनी आणि त्याच्या कार्यालयाने या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे बार्शी वीज कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि तंत्रज्ञ अशा दोघांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे यापुढे तरी शेतात पडलेल्या विद्युत तारांचा स्पर्शामुळे निष्पांपाना आपला जीव गमवावा लागणार नाही, अशी आशा करुयात.
आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी अनेकदा शेतकरी रात्री-अपरात्री शेतात जातात. त्यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच कामचुकार अधिकार्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे जीव वाचतील.
महावितरणच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याबद्दल ऊर्जामंत्री मा. नितीन राऊत साहेबांचे मनापासून धन्यवाद!
यापुढे मोकळ्या विद्युत तारांमुळे एकाचाही जीव जाऊ न देणं, हीच मुख्याध्यापक मा. सतीश गुंड यांना श्रद्धांजली ठरेल.






