Home गडचिरोली क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 122 वी पुण्यतिथी घोट येथे साजरी….

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 122 वी पुण्यतिथी घोट येथे साजरी….

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220609-WA0030.jpg

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 122 वी पुण्यतिथी घोट येथे साजरी….

.जलजंगल जमीनीचा अधिकार मिळवून देणारे पहिले शहीद क्रांतीवीर…..
खा.अशोकजी नेते.

गडचिरोली/घोट(सुरज गुंडमवार ब्युरी चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची घोट येथे 122 व्या पुण्यतिथी निमित्त
देशाचे लाडके पंतप्रधान यांचे 8 वर्ष पूर्ण झाल्याने अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
परकीय, राजकीय व्यवस्थेविरुद्ध
आदिवासी समाजास संघटित करून.
ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन पुकारून.
आदिवासी समाजासाठी लढा देणारे, क्रांतीसुर्य, जननायक, महानस्वातंत्र्य सेनानी, भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्य या प्रसंगी बोलतांना खा.अशोकजी नेते यांनी प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांनी “जनजाती गौरव दिवस” जाहीर करून आदिवासींना न्याय दिला आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र वचनाप्रमाणे आदिवासींना जीवनाची वाटचाल करावी. असे प्रतिपादन खा.अशोकजी नेते यांनी केले.
तसेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आदिवासी शहीदवीरांचे देशात 75 स्मारक व संग्रहालय होणार आहेत. 8 वर्षात आदिवासीच्या विकासासाठी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी बजेटच्याा माध्यमातून तीन लाख बेचाळिस हजार नववे ऐकोनचाळिस कोटी निधी दिला व भारतीय संविधान अनुच्छेदनुसार एक लाख दोनहजार कोटी रुपये आदिवासी विकासाकरिता दिला आहे.असे प्रतिपादन प्रकाशभाऊ गेडाम यांनी केले.
याप्रसंगी नामदेवराव सोनटक्के यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
त्यावेळी मा. खा.अशोकजी नेते,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र,तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्रीअनु. जनजाति मोर्चा.मा.श्री. प्रकाशजी गेडाम प्रदेश महामंत्री भाजपा अनु.जनजाति मोर्चा,मा.श्री. नामदेवराव सोनटक्के माजी ,जि.प.सदस्य,मा.श्री. विलासजी उईके तालुकाध्यक्ष,आदिवासी आघाडी मोर्चा,चामोर्शी.मा.श्री. स्वप्निलभाऊ वरघंटे भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य,मा.श्री.दिलीपजी चलाख तालुकाध्यक्ष, भाजपा चामोर्शी.ऋषीजी कोडापे, रमेश कन्नाके,चंद्रकलाताई तसेच अनेक आदिवासी बांधव कार्यकर्ते उपस्थित होते.
.

Previous articleऑनलाईन प्रणाली मधून अपात्र केलेल्या २२ हजार ३८२ घरकुलांची फेरपडताळणी करून मंजुर यादी बनवा आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleकोथळी ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here