राजेंद्र पाटील राऊत
वालसरा ग्रामपंचायत चे सरपंच अरुण मडावी यांचे सह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश.
जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले पक्षात स्वागत
गडचिरोली:,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): अच्छे दिन चे स्वप्न दाखवून केंद्रात भाजप सरकार सत्तेत आली. मात्र तेव्हा पासून या सरकारने नेहमीच सामान्य जनतेचे लचके तोडण्याचा काम केलेला आहे. अशात वाढत चाललेली महागाई आणि त्या माध्यमातून सामान्य जनतेचे होत असलेले हाल व स्थानिक भाजप व नेते आणि विद्यमान जि.प.सदस्य यांच्यावर असलेली नाराजी याला त्रासून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व काँग्रेस नेतृवावर विश्वास ठेवत वालसरा ग्रामपंचायत चे सरपंच अरूण मडावी, सदस्य दीपाली शेट्ये, सदस्य अश्विनी मूलकलवार सह अनेक भाजप च्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रेवश केला आहे. यामध्ये संदीप कोपुलवार, प्रमोद कुलसंगे, रामचंद्र वैरागडे, हनुमान मूलकलवार, वसंत कोहळे, प्रकाश चीचघरे, बाजीराव कोटनाके, अजय मडावी, गोपाल भांडेकर, रमेश कुमरे, कालिदास मडावी, गुरुदास कुमरे ,चरण मडावी, अमोल मडावी, भाऊजी कुमरे, योगेश कुमरे, राजाराम मेकलवार, पुरुषोत्तम मडावी, विनायक बारसागडे, अतुल भांडेकर, उमेश कुमरे, हरिदास भांडेकर, उद्धव गव्हारे, यमाजी सातपुते, अतुल बुरांडे, प्रभाकर कोपुलवार सह अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, काँग्रेस जेष्ठ नेते हरबाजी मोरे, संजय चन्ने, सुधीर बांबोळे या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन नव सदस्याचे पक्षात स्वागत करण्यात आले.
स्थानिक भाजप नेत्यांच्या ऐकला चलो रे च्या भूमिकेला कंटाळून सरपंच अरुण मडावी सह अनेक भाजप कार्यकर्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने वालसरा परिसरात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केला असून. येणाऱ्या दिवसात सर्वच कार्यकर्त्यांना पक्षात योग्य ती जबाबदारी देण्यात येईल असेही जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यावेळी सांगितले.