Home नांदेड वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू मुखेड तालुक्यातील भगगनुरवाडी येथील शिवारातील घटना

वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू मुखेड तालुक्यातील भगगनुरवाडी येथील शिवारातील घटना

79
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220517-WA0008.jpg

वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

मुखेड तालुक्यातील भगगनुरवाडी येथील शिवारातील घटना

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील भगूरवाडी येथील शिवारातील दिनांक 15 मे 2022 रोजी रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज कोसळून शेतातील आखाड्यावर शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील ठिकाणी तहसीलदार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मुखेड तालुक्यात दिनांक 15 मे 2022 रोजी सायंकाळी अचानक विजेचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले मुखेड पासून पाच किमी अंतरावर भगनुरवाडी शिवारात शेतात आखाड्यावर असलेल्या बालाजी जेजेराव शिंदे वय 40 वर्ष राहणार केरूर तालुका मुखेड यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यूमुखी पडले प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळ येथे मयत बालाजी शिंदे यांचे स्वविच्छेदन करण्यात आल्यानंतर केरूर येथे त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील तीन मुली एक मुलगा चार बहिणी असा परिवार आहे या घटनेचा पंचनामा तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला असून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here