Home गडचिरोली शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्यासाठी जलसंधारण विभागाने प्रयत्न करावे- खास. अशोक नेते यांचे...

शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्यासाठी जलसंधारण विभागाने प्रयत्न करावे- खास. अशोक नेते यांचे प्रतिपादन..

31
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0019.jpg

  1. शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्यासाठी जलसंधारण विभागाने प्रयत्न करावे-
    खास. अशोक नेते यांचे प्रतिपादन..

    जिल्हा जलसंधारण अधिकारी गडचिरोली कार्यालयाचे उदघाटन

    गडचिरोली:- ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
    गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्यास अडचण होत आहे. सिंचनाच्या सुविधे अभावी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. आज गडचिरोलीत जलसंधारण विभागाच्या विभागीय कार्यालयाचे उदघाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे या कार्यलयामार्फत शेतामध्ये तलाव, बोडी, छोट्या नद्यांवर लहान बंधारे प्रस्तावित करून शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. जलसंधारण कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

    आज दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी गडचिरोली कार्यालयाचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कल्याण तथा अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मा. ना. राजेंद्र पाटील यद्रावकर यांच्या हस्ते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते,
    मान.श्री. कृष्णाजी गजबे आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र.
    विशेष अतिथी
    मान.श्री. डॉ. दिलीप पांढरपट्टे.
    सचिव मृदा व जलसंधारण विभाग. मान.श्री. धनाजी पाटील जिल्हाधिकारी प्रभारी गडचिरोली. मान.श्री.व्ही एम. देवराव
    अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता प्रादेशिक क्षेत्र नागपूर.
    मान.श्री कविजीत पाटील
    प्रादेशिक जलसंधारण अधिकारी. मान.श्री. वासुदेवजी शेडमाके
    जिल्हा अध्यक्ष शिवसेना गडचिरोली. मान.श्री. सुनील पाटील
    इत्यादींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

Previous articleप्रत्येक मागास, दर्लक्षित घटकांना बरोबर घेवून राज्य विकासाच्या मार्गावर – राज्यमंत्री, डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर
Next articleओबीसींनी भोंगे लावणे, काढण्याच्या भानगडीत पडू नये – पंकज खोबे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here