Home गडचिरोली विजेसाठी शेतकर्यांनी अडविला मुख्य मार्ग।

विजेसाठी शेतकर्यांनी अडविला मुख्य मार्ग।

154

राजेंद्र पाटील राऊत

विजेसाठी शेतकर्यांनी अडविला मुख्य मार्ग।
गडचिरोली( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-: तालुक्यातील शेतकर्यांच्या कृषिपंपांना विद्युत भारनियमनातील आठ तास विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.कृषिपंपंची रिंडिग करुनच बिले देण्यात यावी.प्रलंबित कृषिपंपासाठी गेल्या चार वर्षापासुन डिमांड भरलेल्या शेतकर्यांना विद्युत कनेक्शन देण्यात यावे.भारनीयमनामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना एकरी 35 हजार रुपये मोबदला देण्यात यावा आदी विविध मागण्यासाठी शेतकरी हक्क संघर्ष समिती आरमोरी च्या वतीने आरमोरी येथील टि पॉईन्ट वर चक्काजाम आंदोलण करण्यात आले.या आंदोलणाचे नेतृत्व आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलिप घोडाम,प्रहार संघटणेचे अध्यक्ष निखिल धार्मीक,माकपाचे जिल्हा सचिव माजी जि.प.सदस्य अमोल मारकवार यांनी केले.आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव,डोंगरगाव,वणखी,वासाळा,सायगाव,शीवणी,लोहारा,कोजबी,करपडा,रवी या गावांतील शेतकरी आपल्या रास्त मागण्यासाठी ठाणेगाव येथे टी पॉईन्टवर जमा झाले.शेतकर्यांच्या कृषिपंपानां 8 तास विज पुरवठा झालाच पाहीजे.अशी नारेबाजी करुन आंदोलण केले,
गडचिरोली येथिल कार्यकारी अभियंता डोगरावर व आरमोरी येथील विज वितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता बोबडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.माञ शेतकर्यांच्या प्रश्नांना कोणतेही उत्तर दिले नाही.आदोंलनकत्याच्या कुटल्याही समस्या जाणुन घेतल्या नाहीत.त्यामुळे शेतकर्यांनी चिळुन जावुन आरमोरी गडचिरोली रोडवर तब्बल पाहुण तास चक्काजाम आंदोलण केले.पोलिसांनी तब्बल 39 शेतकर्यांना अटक करुन त्यांना पोलिस ठाण्यात आणले.नंतर त्याची सुटका केली.यावेळी अमोल मारकवार, वृंदा गजबिये,शेखर धंदरे,सुरेश चापळे,अभिषेक चापले,श्यामराव नंदरधणे,पुंडलिक माणागडे,श्रीराम मेश्राम,अरुण चापडे,प्रल्हाद मरसकोल्हे,प्रकाश मेहरे,राजु सातपुते,आदेश मुरांडे,राजेंद्र डोगे,संजय लोथे,महादेव चौधरी,पिंटु बानबले,किशोर भोयर,चद्रशेखर धदरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.