
राजेंद्र पाटील राऊत
गिव्हा कुटे येथे भिषण पाणी टंचाई
दुबळवेल आठ गाव पाणीपुरवठा योजना बनली शोभेची वस्तू।
महिलांची पाण्यासाठी 1 किमी ची पायपीट गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
– गिव्हा कुटे येथे भीषण पाणी टंचाई आहे महिलांना पाण्यासाठी
किलोमीटर ची पायपीट करावी लागते दुबळावेल ८ गाव पाणीपुरवठा योजना शोभेची वस्तू बनली आहे
येथिल ग्रामस्थाना व तांड्यातील लोकांना 1 किलोमीटर अंतरावरन पाणी आणावी लागत आहे मालेगांव तालुक्यातील ग्रा पं गिव्हा कुटे येथे बारा ते पंधरा वर्षापुर्वी दुबळवेल ८ गाव पाणीपुरवठा योजना ही सोनाळा लघु पाटबंधारे प्रकल्पवरुन कोटी रुपये खर्च करुन सुरु करण्यात आली होती या योजना द्वारा केवळ एक वर्षे पाणी पुरविण्यात आले त्यामुळे गावकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे.शासनाने प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंर्तगत हर घर जल हि योजना कार्यवित केली .पण ही योजना गिव्हा कुटे येथे फक्त कागदपत्रे वरच दाखवण्यात येते कि काय? असा प्रश्न येथे झाला आहे गावात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी एप्रिल महिन्याची चाहुल लागतात ग्रामस्थाना पाण्याच्या व भीषण पाणी टंचाई ला समोर जावे लागत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे येथील नागरिकांना टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ येणार की काय असे वाटत आहे गिव्हा कुटे गावची अंदाजे लोकसंख्या १५००चे आसपास आहे गावांमध्ये जवळपास दोन तीन विहिरी आहेत परंतु त्या सुद्धा पाण्याची पातळी खोल गेल्याने आटण्याच्या मार्गावर आहेत व दोन- हातपंप आहेत व ते सुद्धा नादुरुस्त आहेत एक हातपंप जिल्हा परिषद शाळेत असल्यामुळे सदरचा हातपंप हा पाणीटंचाई दरम्यान गावातील जनतेसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे ,या गावामध्ये गेल्या अनेक वर्षा पासुन पाणी टंचाई भासत असते येथील पाणी टंचाई ची समस्या कायमस्वरुपी दूर होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शोभेची वस्तू बनलेली सोनाळा प्रकल्प येथुन ८ गाव पाणीपुरवठा योजना हि जीवन प्राधिकरण योजना पुन्हा सुरु केल्यास पाणी टंचाई ची समस्या सुटेल पण हि जीवन प्राधिकरणाची योजना केवळ प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शेवटची घटका मोजत आहे त्यामुळे गिव्हा कुटे येथील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्याची चाहुल लागताच पाण्यासाठी पायपीट करावी लागते .
ग्रामस्थाची पाण्यासाठी ची पायपीट दूर व्हावी म्हणून मागील कित्येक वर्षा पासुन विहिर अधिग्रहण करुन ,पाणी समस्या निकाली निघत असते पण गावातील अंबादास कुटे पाटिल यांच्या शेतातील विहिर अधिग्रहण करुन समस्या निकाली निघत असते पण गेले दोन ते तीन वर्षा पासुन विहिर अधिग्रहण करुन सुध्दा त्याना व्यक्ती ला कुठलाच मोबदला प्रशासनाकडुन मिळालेला नाही गावातील विहिरीत पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही हातपंप बंद अवस्थेत आहेत .गावाबाहेर एकच विहिर आहे तिला पण मोजकेच पाणी आहे त्यावरिल मोटरपंप वरुन गावाला ग्रा.पं.मार्फत पाणीपुरवठा केला जात असे पण गेल्या पाच ते सहा महिन्यापासुन वीज बिल ग्रा पं ने भरले नसल्यामुळे ती पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बंद आहे. त्यामुळे गावातील महिलांना १ कि मी वरुन आपला जीव धोक्यात घालुन पाणी आनावे लागत आहे तरी प्रशासनाने वेळीच कायमस्वरुपी नियोजन केले तर येथील पाणी टंचाई समस्या दूर होऊ शकते परंतु नियोजनाच्या अभावामुळे येथील ग्रामस्थाना या पाणी टंचाई ला समोर लागत आहे तर एकीकडे चक्क गावामध्ये टॅंकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे .येथील संभाव्ये पाणी टंचाई लक्षात घेता लवकरात लवकर प्रशासनाने विहिर अधिग्रहण करुन किंवा टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी महिला वर्ग व ग्रामस्थाकडुन होत आहे
——/-
चौकट – गावात पाणीटंचाई आहे विहीर अधिग्रहित करण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे असे सरपंच राजू चव्हाण म्हणाले