राजेंद्र पाटील राऊत
ठेंगोडयात पोलिस अधिकाऱ्यांचा
नागरी सत्कार उत्साहात संपन्न
(नयन शिवदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सटाणा,-तालुक्यातील ठेंगोडा येथे ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
सरपंच नारायण निकम यांच्या संकल्पनेतून ठेंगोडा गावातील पोलिस अधिकारी वसंतराव मोरे यांचेसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा ठेंगोडा गावी करण्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार सदरचा कार्यक्रम शनिवारी १९ मार्च २०२२ रोजी ठेंगोडा गावी सिध्दीविनायक गणेश मंदिरात उत्साहात पार पडला.यावेळी नाशिकचे पोलिस आयुक्त दिपक पांडे,सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अमुलवार यांचाही सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सरपंच नारायण निकम यांनी सत्कार केला.या कार्यक्रमास धर्मवीर अण्णासाहेब केरु पगारे,ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास शिंदे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.धर्मवीर अण्णासाहेब पगारे यांचे हस्ते देखील पोलिस आयुक्त दिपक पांडे यांचा सत्कार करण्यात आला.