Home नाशिक सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम व्हावे या मागणीसाठी सटाणा वकील...

सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम व्हावे या मागणीसाठी सटाणा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घेवून निवेदन दिले होते.

167
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम व्हावे या मागणीसाठी सटाणा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घेवून निवेदन दिले होते.                                      सटाणा,(काकासाहेब सांळुखे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या माध्यमातुन संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी सटाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पंडितबापू भदाणे, उपाध्यक्ष ॲड.एन.पी.चंद्रात्रे, सचिव ॲड.आर.एम.जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदिप आहिरे, वकील संघाचे सदस्य ॲड.सी.एन.पवार, ॲड.पी.के.गोसावी आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

विधी व न्याय खाते हे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडेच असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून नवीन इमारतीबाबत चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन ना.भुजबळ यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार पालकमंत्री ना.भुजबळ साहेब यांच्या माध्यमातली महाविकास आघाडी सरकारने सटाणा न्यायालय ईमारतीसाठी १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधीची तरतुद करुन दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here