
राजेंद्र पाटील राऊत
पाळण्यात केस अडकून
महिला गंभीर जखमी
रायगड,(अरुण कुंभार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-पाळण्यात डोक्याचे केस अडकल्याने एक महिला गंभीर जखमी होण्याची घटना महाडच्या छबिन्यात घडली.या महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार पल्लवी सुरेश कोळवणकर वय ३०,रा.निजामपूर ता.माणगांव जि.रायगड असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.ती आपल्या कुटूंबासह छबिन्याचा आनंद लुटण्यासाठी महाडमध्ये आली होती.पाळण्यात बसत असताना अचानक पाळणा सुरु झाला आणि तिच्या डोक्याचे केस पाळण्यात अडकले त्यामुळे डोक्याच्या केसासह डोक्याच्या त्वचेचा मोठा भाग उपटून पडला.
त्या महिलेला तातडीने डाँ.रानडे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले.डाँ,रानडे यांनी त्वचेचा हा तुटलेला भाग शिवून या महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईला पाठविले आहे.