Home उतर महाराष्ट्र व-हाणेपाडा सोनज परिसरात बिबटयांचा सुळसुळाट शेतकऱ्यांवर बिबटयांचा हल्ला

व-हाणेपाडा सोनज परिसरात बिबटयांचा सुळसुळाट शेतकऱ्यांवर बिबटयांचा हल्ला

228
0

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणेपाडा सोनज परिसरात
बिबटयांचा सुळसुळाट शेतकऱ्यांवर
बिबटयांचा हल्ला
सोनज,(शितल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- मालेगांव तालुक्यातल्या व-हाणेपाडा सोनज परिसरात बिबटयांचा सुळसुळाट वाढल्याने रात्रीच्या वेळेस शेतात कामे करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागात सोनज्या डोंगर असून वनप्रवण क्षेत्र असल्याने,गेल्या दोन चार दिवसापासून या भागात बिबटयाचा वावर असल्याची नागरिकात चर्चा होती,मात्र त्यास अफवा असल्याचे समजून शेतकरी व नागरिकांनी त्याकडे कानाडोळा केलेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री व-हाणेपाडा गावाच्या शिवारात शेतात कांद्याना पाणी देत असलेल्या शेतकरी बारकू बच्छाव यांचेवर बिबटयाने अचानक हल्ला चढविल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.दरम्यान वनविभागाने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Previous articleयेवती येथे प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी  
Next articleएसटी कामगारांचा जीव पुन्हा टांगणीला..,! राज्य शासनात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here