Home महाराष्ट्र सुभाष ढवळे व डॉ . विठ्ठल तिडके हि जोडी निशुल्क विवाह जुळविण्यास...

सुभाष ढवळे व डॉ . विठ्ठल तिडके हि जोडी निशुल्क विवाह जुळविण्यास महाराष्ट्रातून अग्रेसर !

465

राजेंद्र पाटील राऊत

सुभाष ढवळे व डॉ . विठ्ठल तिडके हि जोडी निशुल्क विवाह जुळविण्यास महाराष्ट्रातून अग्रेसर !

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

आजकाल लग्न जमविणे कठीण झाले आहे , त्यातच दलालाचा वाढलेला हस्तक्षेप यातून वधु – वर पित्याची होणारी फसवणूक होताना दिसत आहे . आणि लग्न लावताच दुसरे दिवशी नवरी चोरी करून फरार अशा अनेक उदाहरणे आपल्या समोर दिसत आहे . या गोष्टीवर संपर्क पर्याय सुभाष ढवळे श्रीगोंदा व डॉ . विठ्ठल तिडके जालना . यालाच अपवाद मुळचे हाळगाव येथील रहिवाशी श्री सुभाष अर्जुन ढवळे हल्ली मुक्काम श्रीगोंदा आतापर्यंत म्हणजे सर्व समाजातील 211 विवाह मोफत जुळविले आहे . व अजूनही कार्य चालू आहे . व श्री सुभाष ढवळे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी सत्कार समारंभ झालेले आहेत व वेगवेगळ्या ठिकाणी होतांना दिसत आहेत . तसेच या कार्याबद्दल यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत . दुसरे व्यक्तिमत्व डॉ . विठ्ठल तिडके रेल्वे स्टेशन चौक , जालना , हे रुग्णसेवा करता करता 111 चे वर माळी समाज विवाह निशुल्क जमविले आहेत . अजूनही हे कार्य मोफतच चालू आहे . याचे असे कि सुभाष ढवळे श्रीगोंदा व डॉ . विठ्ठल तिडके जालना यांनी चे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्हात निवडक सहकारी घेऊन whatsaap ग्रुप तयार केले आहेत . त्यात श्री भोंग दीपकराव साहेब अकलूज डॉ . बनसोडे साहेब सातारा श्री विनायक तारो करमाड , जि . औरंगाबाद , श्री . संदीप गाडेकर सर इत्यादी सहकारी घेऊन एकमेकाच्या सहकार्याने हे कार्य चालू आहे . यामध्ये इच्छुक वधु – वर यांनी आपआपल्या जिल्ह्यातील ग्रुप जॉईन करावा लागतो ग्रुप जॉईन झाल्यावर वरील सहकारी सभासद आलेल्या बायोडाटा हा सपूर्ण महाराष्ट्रातील तसेच जवळ असलेले राज्य जसे कर्नाटक , गुजरात , मध्यप्रदेश , व इतर राज्यात असलेल्या नातेवाकापर्यंत पोहचविन्याचे काम ग्रुपद्वारे करतात , व तेथील माहिती देखील घेऊन स्थळ योग्य अयोग्य ठरविण्याचे काम देखील करतात , या बाबतीत विशेस महत्वाची भूमिका सुभाष ढवळे साहेब , ते म्हणजे पालकासोबत जाऊन स्थळाची पाहणी करणे व सदरील खातरजमा करूनच स्थळाविषयी योग्य निर्णय घेण्याचे व वधुवरास समजून सांगण्याचे देखील काम करतात . व डॉ . तिडके हे वेगवेगळ्या अपेक्षा , शैक्षणिक पात्रता अनुरूप जोडीदार शोधून निशुल्क लग्न जमविण्याचे कार्य करतात . या दोघाचेही कार्य मागील ३ ते 4 वर्षापासून आगदी मोफत चालू आहे त्यामुळे श्री सुभाष ढवळे विठ्ठल तिडके याचे सर्वत्र कौतुक होत आहे . तरी इच्छुक वधु वरांनी एक तर ग्रुप जॉईन करावा किवा आपला बायोडाटा ढवळे वधु – वर सूचक श्रीगोंदा . श्री . सुभाष ढवळे संपर्क न . 9730608648 , 9359587117 , व सई वधु – वर सूचक डॉ . विठ्ठल तिडके जालना 9922900930 या नंबरवर पाठवावा , असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleनायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा व राहेर शिवारात चोराचा सुळसुळाट.
Next articleपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सभागृहाचे काम गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.