राजेंद्र पाटील राऊत
व-हाणेत सट्टा माफीयाचे थैमान; !!
जनता कंगाल सट्टामाफीया मालामाल.!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव- तालुक्यातल्या मनमाड रोडवरील व-हाणे गावातल्या स्मशानभूमी परिसरात बिनबोभाटपणे सट्टा मटका जुगाराचा अवैध धंदा सुरु असून,त्यामुळे लहान मुलेबाळे या जुगारापायी बरबाद होण्याची दाट भिती निर्माण झाली असून,या अवैध बेकायदेशीर जुगार सट्टा मटका व्यवसायाकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने हा सट्टा मटका धंदा तेजीत आहे.
ज्या सट्टा मटका जुगारामुळे पौराणिक काळात महाभारतात पांडवाना आपले सर्वस्व जुगारात हरावे लागले होते,आणि द्रौपदीचीला जुगारात पणाला लावण्यात आले होते अगदी त्याच पध्दतीने हा सट्टा माफीया या पट्ट्यातील आदिवासी बांधवाना जुगाराचे नादी लावून कंगाल बनविण्याचा भयानक डाव खेळत आहे.स्वतः मालामाल आणि पोलिसांना थातूरमातूर चिरीमिरी देऊन सट्ट्यच्या रग्गड कमाईतून मालामाल मात्र होत आहे शिवाय त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी वस्तीगृहात शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य देखील या सट्टा माफीयाच्या अवैध व्यवसायामुळे उध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आहे.वास्तविक व-हाणे हे मध्यवर्ती गाव असून,या ठिकाणापासून अवघ्या सहा सात किलोमीटर अंतरावर स्वतंत्र औट पोलिस स्टेशन असूनदेखील सट्टा माफीयांच्या या अवैध व्यवसायाची स्थानिक पोलिसांना माहिती असू नये म्हणजे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्याशिवाय राजकारणात अग्रेसर असलेल्या व-हाणे या गावात चांगल्या कामांना विरोध व अवैध धंद्याना प्रोत्साहन देऊन खतपाणी घालण्याचेच काम तर सुरु नाही ना? असाही प्रश्न यानिमिताने उपस्थित होत आहे.. या परिसरातील भोळ्याभाबडया आदिवासी बांधवाना सट्टा मटका जुगाराच्या नादी लावून त्यांच्या सुखी संसाराची रांखरांगोळी करण्यापुर्वीच पोलिस प्रशासनाने सट्टा माफीयांचे व-हाणेतील साम्राज्य उध्वस्त करावे.