Home नांदेड नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत गौरी विकास पॅनल...

नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत गौरी विकास पॅनल चा दणदणीत विजय.

219
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत गौरी विकास पॅनल चा दणदणीत विजय.
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्यूज)

नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव गौरी येथे
.दिनांक-07-01- 2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेडची निवडणूक घेण्यात आली. त्याचा निकाल गौरी विकास पॅनलचे 13 उमेदवारांपैकी 13 उमेदवार बहुमताने सर्वच्या सर्व निवडून आलेले आहेत. आदरणीय शेळगाव गौरी चे भाग्यविधाते माननीय श्री माधवरावजी पाटील शेळगावकर माजी अध्यक्ष संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता समिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या व त्यांचे सुपुत्र प्राचार्य तथा उपसभापती पंचायत समिती नायगाव चे श्री संजय पाटील शेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक घेण्यात आली होती .गावकऱ्यांनी सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून दिले आहे. ह्यासोबत तरुण मित्रमंडळी ,वडीलधारी मंडळी, गावातील प्रतिष्ठित नागरिक ,तसेच कुचेली. ता. नायगांव व बेटमोगरा ता. मुखेड या गावातील सभासदांचे ही सहकार्य मिळाले आहे म्हणून आदरणीय माधवराव पाटील शेळगावकर यांनी गावकऱ्यांचे व मतदाराचे मनपुर्वक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here