Home नांदेड जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांना नांदेड येथे भव्य कार्यक्रमात रिपब्लिकन रत्न पुरस्कार प्रदान.

जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांना नांदेड येथे भव्य कार्यक्रमात रिपब्लिकन रत्न पुरस्कार प्रदान.

69
0

राजेंद्र पाटील राऊत

जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांना नांदेड येथे भव्य कार्यक्रमात
रिपब्लिकन रत्न पुरस्कार प्रदान.

नांदेड / मनोज बिरादार  ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

आंबेडकरी  चळवळीत स्वतः ला झोकून देऊन 50 वर्षे (सुवर्ण कालखंड) पुर्ण केल्या बद्दल रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांना नांदेड येथे  भव्य कार्यक्रमात रिपब्लिकन रत्न
पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शेकडो लोकांची उपस्थिती होती.

दलित पँथरच्या मुशीतून घडललेले पँथर नेते ,आंबेडकरी चळवळीचे जेस्ठ नेते दशरथराव लोहबंदे यांनी नामांतर लढ्या पासून गायरान जमीनीचे प्रश्न ,अन्याय अत्याचारा विरोधात आंदोलने केली गेल्या ५ दशकांपासून मुखेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणच्या शोषित वंचित लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झिजणा-या दशरथराव लोहबंदे  या एका पॅंथर लढवय्यास रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने लोहबंदे यांच्या कार्याची दखल घेवुन  रिपब्लिकन रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता .
रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्या साठी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .भिमाकोरेगाव युध्दाचे सरसेनापती सिध्दनाका महार यांचे बारावे वंशज मिलिंद इनामदार यांच्या हस्ते जेस्ठ आंबेडकरी नेते जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांना शाल,तामल पत्र ,देवुन रिपब्लिकन रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी जेस्ठ पँथर नेते रमेश भाई खंडागळे,प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर,रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे,एन.डी.गवळे,कोंडदेव हटकर याची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यासाठी शेकडो नागरिकाची उपस्थिती होती. दरम्यान जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here