राजेंद्र पाटील राऊत
चिकटगाव ग्रामपंचायत व बबनराव निकम विभागीय संपादक युवा मराठा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
_________________________
औरंगाबाद :बबनराव निकम- विभागीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल अँन्ड पेपर
_________________________
वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनल अँन्ड पेपरचे विभागीय संपादक बबनराव निकम व ग्रामपंचायत चिकटगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29/ 12 /2021 बुधवार रोजी, राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा माननीय श्री. उत्तमराव निकम उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून श्री. बबनराव निकम विभागीय संपादक, राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते, आर के पाटील माजी सरपंच, श्री बी के जाधव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकटगाव, गणेश निकम उपाध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस, आनंद निकम अध्यक्ष शालेय समिती न्यू हायस्कूल चिकटगाव ,किशोर मगर तालुकाध्यक्ष छावा संघटना, विक्रांत निकम राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी श्री उत्तमराव निकम हे व्यासपीठावरून बोलताना म्हणाले, राष्ट्रीय युवा मराठा महासंघाचे कार्य हे अनमोल आहे तसेच युवा मराठा पत्रकार संघातील पत्रकार हे कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील राहणार नाही तर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी मी अपेक्षा करतो व त्यांनी युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेस शुभेच्छा दिल्या, यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील निकम यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांनी जाहिरातीची अपेक्षा न ठेवता सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी व जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली, छावा तालुकाध्यक्ष श्री किशोर मगर यांनी आपल्या भाषणातून युवा मराठा दिनदर्शिके शुभेच्छा देऊन पत्रकारांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून समाजहिताचे काम करावे. राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक श्री भागवत निकम सर यांनी युवा मराठा दिनदर्शिकेसण शुभेच्छा देऊन आभार प्रदर्शन केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतशील शेतकरी,मदनराव निकम, किरण गायके, रामदास निकम, शेषराव निकम, निलेश निकम, महेश निकम, जगदीश निकम, गोविंद शेलार, मदन मगर ,सोनू मगर, संदीप पांडुरंग निकम, विष्णू निकम, बाबासाहेब चव्हाण, भाऊसाहेब निकम, दिनकर निकम, रामकृष्ण निकम, सोमनाथ चव्हाण, नारायण भगत, नवनाथ निकम, पद्माकर निकम, श्रीकृष्ण निकम, बलराम निकम, आदेश निकम, गणेश निकम, बापू निकम आदींची यावेळी उपस्थिती होती