Home मराठवाडा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानदानात शिक्षकांनी कसर करु नये..मु.अ.संजय खरात. माजी सहकार मंत्री कै.विनायकराव...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानदानात शिक्षकांनी कसर करु नये..मु.अ.संजय खरात. माजी सहकार मंत्री कै.विनायकराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न..

202
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211228-WA0036.jpg

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानदानात शिक्षकांनी कसर करु नये..मु.अ.संजय खरात.

माजी सहकार मंत्री कै.विनायकराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न..
—————————————-

औरंगाबाद: बबनराव निकम- विभागीय संपादक युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँन्ड पेपर

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानदानात शिक्षकांनी कसर करु नये, आणि विद्यार्थ्यांनी देखील ज्ञानार्जन करण्यापासून वंचित राहू नये.कारण माजी सहकार मंत्री, शिक्षण महर्षी,सहकार महर्षी, कै.विनायकराव पाटील यांच्या मुळ संकल्पनेतून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील बहुजनांचे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये.हा प्रमाणिक हेतू त्यांचा होता त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांनी एक प्रतिज्ञा करावी.तरच विनायकराव पाटील यांना अभिवादन केल्याचे समाधान लाभेल.असे प्रतिपादन न्यू हायस्कूल तलवाडा शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी पुण्यतिथी निमित्त तलवाडा येथे बोलतांना केले.
विनायकराव पाटील यांचे भाचे जयप्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली न्यू हायस्कूल तलवाडा ता.वैजापूर येथे पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कै. विनायकराव पाटील आण्णा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती आप आपल्या भाषणात व्यक्त केले.
जेष्ठ शिक्षक कोन्हेर नाडगौडा यांनी देखील आपल्या भाषणात मुळ संकल्पनेतून विनायकराव पाटील यांनी संस्थेची स्थापना कसी केली.याची सविस्तर माहिती सांगितली.तर पत्रकार हसन सैय्यद यांनी महाराष्ट्राचे भूषण राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या जडणघडणीत विनायकराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी विद्यार्थ्यांना भाषणातून सांगितले.
सहशिक्षक गंगाधर तोटेवाड यांनी प्रास्ताविक भाषणात विनायकराव पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या संस्थेत आज घडीला ग्रामीण भागातील व शहरी भागातील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि साडे पाच हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या संस्थेत काम करतात. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे येऊन जात ज्ञानार्जन करून पदरात ज्ञानाची भर पाडून घ्यावी. तरच कार्यक्रमाचे सार्थक होईल..
यावेळी मुख्याध्यापक संजय खरात, जेष्ठ शिक्षक कोन्हेर नाडगौडा, तुषार शिरसाठ, गंगाधर तोटेवाड, सुरेश गायकवाड, बाळासाहेब लिमकर, जयप्रकाश पवार, नरेंद्र पोटे, राजेंद्र जोर्वेकर, बबनराव निकम, हसन सय्यद, शंकर चव्हाण आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर तोटेवाड यांनी तर आभारप्रदर्शन नरेंद्र पोटे यांनी केले…

Previous articleशिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाचे संस्थापक श्री.प्रशांत नथ्थु सुर्यवंशी व डॉ.सौ.रेखाताई प्रशांत सुर्यवंशी यांचा लाडका मुलगा चि.पुष्कर उर्फ यशराज याच्या वाढदिवसाला मालेगाव व देवळा तालुक्यातील असंख्य मान्यवरां कडून शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव
Next articleमालेगाव मनपा नगरसेवक संजय काळे यांच्या प्रयत्नांने विकास कामांचा धडाका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here