Home उतर महाराष्ट्र मालेगांव तालुक्यातील गटसचिवांचा निवडणूकांवर बहिष्कार -भरत खैरनार

मालेगांव तालुक्यातील गटसचिवांचा निवडणूकांवर बहिष्कार -भरत खैरनार

312
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांव तालुक्यातील गटसचिवांचा
निवडणूकांवर बहिष्कार -भरत खैरनार
मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)-राज्यातील गट सचिवांचे सेवा वेतनांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन उदासीन असून,त्यामुळे गटसचिवांमध्ये शासनाच्या या धोरणाविषयी संतापाची लाट उसळलेली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी गटसचिवांनी विविध कार्यकारी सेवा संस्थाच्या निवडणूक कामावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती गट सचिव संघटनेचे मालेगांव तालुकाध्यक्ष भरत धनसिंग खैरनार यांनी दिली.
ते “युवा मराठा न्युज”शी बोलताना म्हणाले की,
राज्यातील गट सचिव व संस्था नियुक्त सचिवांच्या सेवा वेतनाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गट सचिव आणि कर्मचारी संघटनेने अनेक वेळा मुख्यमंत्री ,
उपमुख्यमंत्री,तसेच अर्थमंत्री ,सहकारमंत्री
प्रधान सचिव आणि सहकार आयुक्त आदींच्या भेटी घेत वेळोवेळी मागण्यांचे निवेदन सादर केलेत.मोर्चा,आंदोलने
करुनही शासनाने अद्याप पर्यत दखल घेतली नाही.गट सचिवांच्या अशा अनेक अडचणी व समस्या आहेत.
की,ज्यामुळे गट सचिव आर्थिकदृष्ट्या अडचणीत व मानसिक चिंतेत जीवन जगत आहेत.या सगळ्या गोष्टींचा विचार करुन महाराष्ट्र राज्य गट सचिव व कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीने राज्यभरातील सोसायटयांच्या
निवडणूक कार्यक्रमावर व सर्व शासकीय माहिती न देण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनाचाही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शेवटी संघटना प्रतिनिधी भिला निकम यांनी दिली.या धरणे आंदोलनाची व्याप्ती कशा पध्दतीने वाढविता येईल याचा संघटनेच्या वतीने लवकरच निर्णय घेतला जाईल असेही यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ निकम यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here