राजेंद्र पाटील राऊत
थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांना अभिवादन
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड / प्रतिनिधी
मुखेड शहरातील धोबी गल्ली येथील संत गाडगे बाबा चौकात दि २० डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून धोबी समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
समाजाच्या उन्नतीसाठी आयुष वेचणारे दिन – दुबळ्यांचे कैवारी, दिवसा हातामध्ये खराटा घेऊन गाव स्वच्छ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे डोके स्वच्छ करणारे कीर्तनकार, व स्वच्छतेचे मूलमंत्र देणारे स्वच्छतेचे जनक, देव दगडात नसून तो माणसात आहे अस पटवून देणारे अज्ञान, अंधश्रद्धा, आणि स्वच्छता याबद्दल जनजागृती निर्माण करणारे थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिना निमित्ताने शहरातील धोबी समाजाच्या वतीने धोबी गल्लीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी मारोती विभुते,राजेश विभुते, माधव तडखेलकर, मानीक डोगरे , लक्ष्मीकांत उकळकर , बालाजी मामीलवाड, साई डोगरे , शिवराज भुरे, नागेश मामीलवाड , लक्ष्मीकांत मुखेडकर , माधव डोगरे,जयराम विभुते , रमेश डाकळे ,अजय येवतीकर, योगेश डाकळे, गणेश उकळकर, हणमंत ईबितदार ,गोवीद मुखेडकर, गणेश डोगरे , नागेश मुखेडकर , संकेत मुखेडकर ,व योगेश मामीलवाड मित्र मंडाळाचे असंख्ये तरूण उपस्थित होते.