Home नांदेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड दक्षिण संपर्क प्रमुख पदी – शिवाजी गेडेवाड

प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड दक्षिण संपर्क प्रमुख पदी – शिवाजी गेडेवाड

194
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रहार जनशक्ती पक्षाच्या नांदेड दक्षिण संपर्क प्रमुख पदी – शिवाजी गेडेवाड

नांदेड-( मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शेतकऱ्यांच्या न्याय , हक्कासाठी लढणारे
शिवाजी गेडेवाड यांच्या कार्याची दखल घेऊन प्रहार संघटनेच्या पक्षश्रेष्ठींनी प्रहार संघटनेच्या नांदेड जिल्हा दक्षिण संपर्क प्रमुख पदी यांची निवड केली आहे.

मुखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे १४ डिसेंबर रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख , नांदेड शहरप्रमुख प्रितपालसिंह शाहू महाराज , नांदेड दक्षिण अध्यक्ष शंकरअण्णा वडेवार , मुखेड तालुकाध्यक्ष शिवानंद बंडे , शहर प्रमुख साईनाथ बोईनवाड , यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केला आहे .

राज्यमंत्री बच्चू कडू यांची जनतेचे काम करण्याची पद्धत व भाषणे ऐकून प्रेरीत झालेले अनेक तरुणांनी प्रहारमध्ये प्रवेश करीत आहेत . प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तालुका प्रहार संघटनेची कार्यकारणी जाहिर करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

शिवाजी गेडेवाड यांच्या कामाची दखल घेऊन ना‌.बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विठ्ठलभाऊ देशमुख यांच्या हस्ते हि निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटना शहराध्यक्ष संजय कांबळे, रणजीत जामखेडकर,अनिल घायाळे , संतोष इंगोले, बालाजी राठोड,सतिष शिंदे, गोपाळ पा जाहुरकर, दिगांबर मामीलवाड, बळीराम गेडेवाड,पांडूरंग टाळीकोटे , योगेश चव्हाण , राजेश चव्हाण परमेश्वर राठोड , परमेश्वर चामनर नामदेव सोळनर , मारोती बलूरे , बालाजी टाळीकोटे , विजय चव्हाण , शाहरूख शेख , सचिन धूळगंडे , सचिन टाळीकोटे , मारोती टाळीकोटे यांची उपस्थिती होती.
गेडेवाड यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleबंगळूरात शिवप्रेमी आक्रमक : पुन्हा एकदा महाराष्ट्र – कर्नाटकात वाद चिघळण्याची शक्यता..?
Next articleदुर्गादैत्य गावातील इलेक्ट्रिक पोल दुरुस्तीची लेखी तक्रार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here