Home नांदेड सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे – पालकमंत्री अशोक...

सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे – पालकमंत्री अशोक चव्हाण

128
0

राजेंद्र पाटील राऊत

सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे – पालकमंत्री अशोक चव्हाण

देगलूर प्रतिनिधी / राजेश भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

 

प्रशासकीय सोईच्या दृष्टीने अनेक नानाविध तंत्रज्ञानावर आधारित माध्यमे विकसीत झाली आहेत. या माध्यमांचा जिल्ह्यातील प्रशासनाला लोकाभिमूखतेची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या सहमतीतून ज्या सभागृहात नियोजनाचा आराखडा तयार केला जातो त्या सभागृहालाही आता अत्याधुनिक माध्यम व तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वैभवाला नवी जोड मिळाल्याचे गौरोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्ह्यातील ५ नगरपरिषदांना सुसज्ज अग्निशमन दल वाहनाचे हस्तांतरण, डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथील मुख्य सभागृहात उभारण्यात आलेल्या नवीन भव्य डिजिटल एलईडी डिस्पलेचे अनावरण, ग्रीन जिमचे उद्घाटन, श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे आरोग्य विभागाच्या 10 रुग्णवाहिकेचे लोकार्पण, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन, नांदेड वाघाळा शहर मनपाच्या स्टेडिअम परिसरातील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन आणि क्लब रोडच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असून प्रशासकीय सेवा सुधारण्यासमवेत आरोग्याच्या सेवा-सुविधा पर्यंत याचबरोबर चांगले निकोप आरोग्य प्रत्येकाला लाभावे, युवकांना विविध खेळांच्या सरावासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर मी अधिक भर दिला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील बॅडमिंटन व टेनिस कोर्टचे हे सर्व सुविधायुक्त दोन हॉल राष्ट्रीय पातळीवरील नवीन खेळांडू घडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्याचे पॅरानॅशनल चॅम्पियम बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नाव उज्ज्वल करणाऱ्या लता उमरेकर हिचा यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्कार केला. उत्तराखंड येथे सन २०१९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत लता उमरेकर हिने सिलव्हर मेडल प्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here