Home सामाजिक जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.

जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.

203

राजेंद्र पाटील राऊत

जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.                                                                            पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज मनोर ता.जिल्हा पालघर येथे साजरा करण्यात आला .सकाळी भगवान बिरसा मुंडा चौक येथे पूजन करून पारंपरिक नाचाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्याठिकाणी सुनील किरकिरा सर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्याप्रसंगी राज्यपाल नियुक्त राज्य जनजाती सल्लागार समितीचे सदस्य मिलिंद थत्ते ,प्रमुख वक्ते संतोष हडबाल ,मनोर व परिसरातील येथील प्रतिष्ठित नागरिक,आदिवासी समाजाचे नागरिक बंधू भगिनी उपस्थित होत्या.तसेच आदिवासी एकता मित्र मंडळाचे मुख्य संपर्क कार्यालय बिरसायत येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आला त्याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक संतोष जनाठे यांनी केले,बिरसायत ची माहिती मंगेश गोंड यांनी दिली तसेच युवांचा वतीने विशाल ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर मुख्य वक्ते संतोष हडबाळ यांनी भगवान बिरसा आबा यांचे जीवन चरित्र मांडले .त्यानंतर योगेश भुयाल यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर सांगड, तारपा नाच ,गौरी नाच याचेवर उपस्थित आदिवासी समाजातील महिला पुरुषांनी फेर धरला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय धापशी सर यांनी केले.याप्रसंगी मंचावर संतोष हडबाल ,दामोदर कासट,सुनील किरकिरा,कुमावत सर,सुनील पवार,दामोदर भूयाल,गोविंद बुजड,मंगेश गोंड,योगेश भूयाल, आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाचे विश्वस्त मंडळ,कार्यकारी समिती,सर्व मंडळाच्या शाखांचे पदाधिकारी,महिला -पुरुष कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली तसेच अनेकांनी आर्थिक व वस्तुरुपी देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.

Previous articleएसटी संपाचा फटका मालवाहतूक कंपनीला बसला आहे,मालवाहतुकीचा व्यवसाय ठप्प झाल्याने मोठे आर्थिक नुकसान
Next articleबंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा – जिल्हाधिकारी पवनीत कौर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.