Home नांदेड भगनुर येथे वाल्मिक जयंती उत्साहात साजरी महर्षी वाल्मिकी सभामंडपाचे आमदार तुषार राठोड...

भगनुर येथे वाल्मिक जयंती उत्साहात साजरी महर्षी वाल्मिकी सभामंडपाचे आमदार तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

85
0

राजेंद्र पाटील राऊत

भगनुर येथे वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

महर्षी वाल्मिकी सभामंडपाचे आमदार तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

मुखेड प्रतिनिधी/मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मौजे भगनुर बाल्मीकि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दि 13 नोव्हेंबर रोजी आमदार डॉ तुषार राठोड यांच्या हस्ते आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले यासोबत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष अंड सुभाष इंगळे भगनुरकर यांनी केले अंड सुभाष इंगळे बोलताना महर्षी वाल्मिकीच्या जीवन चरित्र पासून सर्वांनी आपल्या जीवनात चांगला बदल घडून आणावा भगवंतांच्या नामाचे स्मरण करावे नामसकीर्तन करावे व आपला उद्धार करून घ्यावा असे सांगितले तसेच गावच्या विकास कामासाठी आमदार निधी तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती अँड इंगळे यांनी आमदार तुषार राठोड यांना केली सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ तुषार राठोड यांनी पाच लक्ष रुपयांचा आमदार निधी गावातील विकास कामांना देण्याचे जाहीर केले तसेच शासनांच्या सर्व योजनांचा भगनुरवासियांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले ह्या कार्यक्रमाला मुखेड पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण पाटील मुखेड तालुका कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती अंड खुशाल पाटील उमरदरीकर पंचायत समितीचे माजी सभापती अँड बळवंतराव पाटील बेटमोगरेकर तसेच गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास चिकटवाड अशोक बोईनवाड जयसिंग मेथेवाड गंगाधर बोईनवाड परसराम झिंकवाड व त्यांचे सर्व सहकार्याने खूप मेहनत घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here