राजेंद्र पाटील राऊत
जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.
जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा.
आज मनोर ता.जिल्हा पालघर येथे साजरा करण्यात आला .सकाळी भगवान बिरसा मुंडा चौक येथे पूजन करून पारंपरिक नाचाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्याठिकाणी सुनील किरकिरा सर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्याप्रसंगी राज्यपाल नियुक्त राज्य जनजाती सल्लागार समितीचे सदस्य मिलिंद थत्ते ,प्रमुख वक्ते संतोष हडबाल ,मनोर व परिसरातील येथील प्रतिष्ठित नागरिक,आदिवासी समाजाचे नागरिक बंधू भगिनी उपस्थित होत्या.तसेच आदिवासी एकता मित्र मंडळाचे मुख्य संपर्क कार्यालय बिरसायत येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आला त्याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक संतोष जनाठे यांनी केले,बिरसायत ची माहिती मंगेश गोंड यांनी दिली तसेच युवांचा वतीने विशाल ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर मुख्य वक्ते संतोष हडबाळ यांनी भगवान बिरसा आबा यांचे जीवन चरित्र मांडले .त्यानंतर योगेश भुयाल यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर सांगड, तारपा नाच ,गौरी नाच याचेवर उपस्थित आदिवासी समाजातील महिला पुरुषांनी फेर धरला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय धापशी सर यांनी केले.याप्रसंगी मंचावर संतोष हडबाल ,दामोदर कासट,सुनील किरकिरा,कुमावत सर,सुनील पवार,दामोदर भूयाल,गोविंद बुजड,मंगेश गोंड,योगेश भूयाल, आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाचे विश्वस्त मंडळ,कार्यकारी समिती,सर्व मंडळाच्या शाखांचे पदाधिकारी,महिला -पुरुष कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली तसेच अनेकांनी आर्थिक व वस्तुरुपी देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला. पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज मनोर ता.जिल्हा पालघर येथे साजरा करण्यात आला .सकाळी भगवान बिरसा मुंडा चौक येथे पूजन करून पारंपरिक नाचाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्याठिकाणी सुनील किरकिरा सर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्याप्रसंगी राज्यपाल नियुक्त राज्य जनजाती सल्लागार समितीचे सदस्य मिलिंद थत्ते ,प्रमुख वक्ते संतोष हडबाल ,मनोर व परिसरातील येथील प्रतिष्ठित नागरिक,आदिवासी समाजाचे नागरिक बंधू भगिनी उपस्थित होत्या.तसेच आदिवासी एकता मित्र मंडळाचे मुख्य संपर्क कार्यालय बिरसायत येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आला त्याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक संतोष जनाठे यांनी केले,बिरसायत ची माहिती मंगेश गोंड यांनी दिली तसेच युवांचा वतीने विशाल ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर मुख्य वक्ते संतोष हडबाळ यांनी भगवान बिरसा आबा यांचे जीवन चरित्र मांडले .त्यानंतर योगेश भुयाल यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर सांगड, तारपा नाच ,गौरी नाच याचेवर उपस्थित आदिवासी समाजातील महिला पुरुषांनी फेर धरला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय धापशी सर यांनी केले.याप्रसंगी मंचावर संतोष हडबाल ,दामोदर कासट,सुनील किरकिरा,कुमावत सर,सुनील पवार,दामोदर भूयाल,गोविंद बुजड,मंगेश गोंड,योगेश भूयाल, आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाचे विश्वस्त मंडळ,कार्यकारी समिती,सर्व मंडळाच्या शाखांचे पदाधिकारी,महिला -पुरुष कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली तसेच अनेकांनी आर्थिक व वस्तुरुपी देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.