राजेंद्र पाटील राऊत
जांबियातील राशन परवाना रद्द करा कॉग्रेस ची मागणी। गडचिरोली :(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- एटापल्ली तालुक्यातील जांबीया येथील राशन दुकांनदाराना धांन्याचा काळाबाजार करतांना नागरीकांनी रंगेहाथ पकडले होते.त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका कॉग्रेस अध्यक्ष संजय चरडूके व बहूजण कल्याण ,मदत व पुर्णवसनमंञी विजय वडेट्टीवार यांच्या कडे केली आहे. हे रास्त धान्य दुकान परिमल गाईन यांच्या नावाने मंजुर आहे.संबधित दुकांनदारास एक वाहनातुन (mh33g 2446)27 पोते धांन्याची अफरातफ करतांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले होते.प्रशासकिय कार्यवाहीसाठी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले होते.प्रशासनाने कार्यवाहि करुन परिमल गाईन यांचा सस्त धान्य परवाना निलंबित केला होता.त्यानंतर माञ आठ महिण्यात कार्यवाही शिथिल करुन परवाना कायम करण्यात आला आहे .परिमल गाईन हे पुन्हा धांन्याचा काळाबाजार करित आहेत.त्यामुळे त्यांच्याकडील दुकानाच्या परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडूके,पंचायत समितिचे सदस्य बेबी लेकामी,संरपंच राजु नरोटे,निजाम पेंदाम,किशोर हिचामी, मंगेश उसेंन्डी, संजय पुंगाटी,चेतन हिचामी,रैनू पुगांटी,राजु हिचामी,किसन हिचामी,चंपत करमाकर,क्रष्णा नैताम, अमर हिंचामी,चमरु हिचामी ,कोलु हिचामी यांनी केली आहे.