राजेंद्र पाटील राऊत
रुपालीताई चाकणकर महाविकास आघाडी व पुणे शहराच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
पुणे : विलास पवार ( पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे:-बालगंधर्व नाट्य मंदिर येथे राज्याचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.
विद्येच्या माहेरघरात व जिथे माझे राजकारण व समाजकारण सुरू झाले त्या माझ्या घराच्या मैदानावरचा हा सन्मानसोहळा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. यामुळे जबाबदारीची जाणीव तर नक्कीच होतेय पण काम करण्याची ऊर्जादेखील मिळतेय. पुढील येणाऱ्या काळात या पदाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांची मान उंचावेल व पुणेकरांना अभिमान वाटेल असे काम आयोगाच्या माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त करते.
आजच्या सन्मान सोहळ्यासाठी पुण्याची लेक म्हणून ज्यांनी अतिशय देखणे असे नियोजन केले ते शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, आदरणीय अंकुशआण्णा काकडे व माझे बंधु दिपकभाऊ मानकर यांचे मी विशेष आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करते.
यावेळी माजी मंत्री सचिन अहिर, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार वंदनाताई चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, अंकुश आण्णा काकडे, माजी आमदार कमल नानी ढोले, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली ताई धुमाळ, नगरसेवक दिपक भाऊ मानकर, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग भाऊ वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पृथ्वीराज सुतार, संदीप बालवडकर, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.