Home उतर महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आगीचे तांडव,१० जणांचा मृत्यू..! ठाकरे साहेब आपला आरोग्य विभागच...

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आगीचे तांडव,१० जणांचा मृत्यू..! ठाकरे साहेब आपला आरोग्य विभागच व्हेंटिलेटर वर आहे….?

129
0

राजेंद्र पाटील राऊत

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आगीचे तांडव,१० जणांचा मृत्यू..! ठाकरे साहेब आपला आरोग्य विभागच व्हेंटिलेटर वर आहे….?

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात लागेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.अहमदनगरमध्ये आज एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. येथील जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला.

तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्याचं समोर आलं आहे. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यूआगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून, तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. असं नाना पटोले यांनी ट्विट केलेलं आहे.

Previous articleआष्टी पोलिसांची धडक कारवाई गडचिरोली
Next articleमहाराष्ट्राबाहेर शिवसेनेची कलाबेन डेलकर यांच्या विजयाने पहिली विजय पताका ….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here