Home कोकण आर्थिक विकासासाठी बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ....

आर्थिक विकासासाठी बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील…

123
0

राजेंद्र पाटील राऊत

आर्थिक विकासासाठी बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील…
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I २८ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी आर्थिक विकास साधण्यासाठी बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले.

अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक तर्फे जिल्ह्यात क्रेडीट आऊटरिच कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील व उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांना यावेळी व्यापार कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज आदि कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले.या कार्यक्रमासाठी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक केशवकुमार , अग्रणी बँकचे व्यवस्थापक एन. डी. पाटील, कुमार प्रमोद सिंग, मनीष त्रिपाठी, कृषी विभागाचे डी.के. जाधव आदि मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.

करोना काळात बिघडलेले अर्थचक्र हळूहळू पूर्ववत होत असून रोजगार, व्यवसाय, नोकरी मध्ये हळूहळू गती देण्यात येत आहे. या अर्थचक्राला अधिक गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून बँकामार्फत विविध क्रेडीट कर्जच्या योजना राबविण्यात येत आहेत. तरी आपला आर्थिक विकास साधण्यासाठी बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले. त्यानंतर श्री.केशवकुमार यांनी बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले. यावेळी कृषी, मत्स्य, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अर्थसहायाबाबतची माहिती तसेच बचतगट, स्वयंरोजगार यासाठी राबविण्यात येणाऱ्या बँकेच्या विविध योजनांची माहिती कुमार प्रमोद सिंग, मनिष त्रिपाठी व डी. व्ही. जाधव यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी दिली.

Previous articleरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या धन्वंतरी, आदर्श शिक्षक पुरस्कारांचे शानदार वितरण
Next articleएस टी कर्मचाऱ्यांचे कालपासून बेमुदत उपोषण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here