Home पश्चिम महाराष्ट्र टेंभुर्णी येथील जळालेल्या ऊसाचा प्रश्न मार्गी…….

टेंभुर्णी येथील जळालेल्या ऊसाचा प्रश्न मार्गी…….

108
0

राजेंद्र पाटील राऊत

टेंभुर्णी येथील जळालेल्या ऊसाचा प्रश्न मार्गी…….
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

टेंभुर्णी परिसरातील शेतकरी श्री कृष्णा हरी देशमुख यांचा 3 एकर 86032 जातीचा आडसाली लागण असणारा ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला. तेव्हा या शेतकरी कुटुंबीयांनी टेंभुर्णीचे युवा नेते श्री ऋषीकेश (बंटीनाना) बोबडे यांच्याशी संपर्क साधला. सदरील जळालेल्या ऊसाची माहिती श्री बंटीनाना यांनी माढा तालुक्याचे सभापती युवानेते आदरणीय श्री विक्रमदादा शिंदे यांच्या कानावर घातली. श्री विक्रमदादा यांनी लगेचच कै. वि. शिंदे सह. साखर कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन ऊस तोडून न्यायला सांगितले. कारखान्यानेही ताबडतोब टेंभुर्णी विभागाचे संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन जळालेल्या उसाच्या तोडणीला सुरुवात केली. मा. आमदार श्री बबनदादा शिंदे यांच्या विचाराचा वारसा घेऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे माननीय सभापती युवानेते श्री विक्रमदादा शिंदे यांचे संबंधित शेतकरी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी खूप खूप आभार मानले.मा. आमदार श्री बबनदादा शिंदे आणि शिंदे कुटुंबीय हे सदैव शेतकरी आणि कष्टकरी लोकांचे प्रश्न सोडवतात आणि ते सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहेत व कायम राहतील असे राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री ऋषिकेश (बंटीनाना) बोबडे म्हणाले.जळालेला ऊस, शेतकऱ्याचा सोडवलेला प्रश्न आणि ताबडतोब कारखान्याने केलेली ऊसतोड याचे सर्व परिसरातून स्वागत होत आहे. सर्वांनी कै. वि. शिंदे सह. साखर कारखान्याचे आभार मानले

Previous articleशिक्षकांना जूनी पेन्शनकरीता शासनस्तरावर पाठपुरावा करु – पालकमंत्री ना. बच्चू कडू
Next articleमहाविकास आघाडीत – बिघाडी, एक आमदार महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करतात…,तर दुसरे निवडणुकीत मताला ३ हजार वाटले सांगतात….?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here