Home माझं गाव माझं गा-हाणं तळवाडे ते मालेगाव बस सुरू करा. मागणी.

तळवाडे ते मालेगाव बस सुरू करा. मागणी.

388
0

राजेंद्र पाटील राऊत

तळवाडे ते मालेगाव बस सुरू करा. मागणी.
मालेगाव :(निंबा जाधव विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- तालुक्यातील तळवाडे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गेल्या दीड वर्षापासून बस बंद आहे.बस बंद असल्याने नागरिकांना मालेगाव येथे कामानिमित्त येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.लखमापूर येथून अथवा रावळगाव येथे येऊन मगच बसणे प्रवास करावा लागत आहे.
नुकताच शासनाने महाविद्यालय चालू करण्याबाबत निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.तेव्हा तळवाडे येथे रात्री मुक्कामी येणारी तसेच दुपारच्या वेळेत चालू असणारी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी तळवाडे ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे मालेगाव आगार प्रमुख ढगे यांचे कडे केली आहे. त्यांनी निवेदनाची दखल घेऊन तळवाडे मालेगाव बस येत्या चार ते पाच दिवसात सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या वेळी बंडू कुवर,निंबा जाधव,डॉ.वाघ,दादाजी जाधव,उत्तम जाधव इ.सह विद्यार्थी व नागरिक हजर होते.

Previous articleसह्याद्री प्रतिष्ठाण कडून धर्मवीरगड दुर्गापुजन कार्यक्रम संपन्न
Next articleशिक्षकांना जूनी पेन्शनकरीता शासनस्तरावर पाठपुरावा करु – पालकमंत्री ना. बच्चू कडू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here