Home मुंबई “हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” उदयनराजे...

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” उदयनराजे संतापले

176
0

राजेंद्र पाटील राऊत

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” उदयनराजे संतापले

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल)

“जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपाचं षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांच झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण”.
ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असं उदयनराजे म्हणाले आहेत
राज्यात सध्या ईडीच्या कारवायांवरुन राजकारण रंगलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडीकडून चौकशी केली जात आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“ईडीने यावं पण कारवाई करणार असाल तरच या अन्यथा येऊ नका. नाहीतर परत यांचा, त्यांचा फोन आला म्हणून सांगतील. तसं असेल तर येऊ नका, येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. नाहीतर उद्या उगाच राजकारण झालं, द्वेषापोटी अशी आरडाओरड होऊ नये,” असं आव्हानच उदयनराजेंनी दिलं आहे. यावेळी त्यांनी ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असं म्हटलं आहे

उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला होता. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असंही ते यावेळी म्हणाले होते.

“जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपाचं षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांच झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here