राजेंद्र पाटील राऊत
टुनकी येथे नंदू मोरे व सागर गोरे यांचा नागरी सत्कार.
————————————————–
ब्युरो चिफ: बबन निकम औरंगाबाद
वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सागर गोरे या तरुणांनी भारतीय रेल्वेच्या २०१८ च्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याने रेल्वे विभागाच्या वतीने त्यास नियुक्तीपत्र देण्यात आले. गावातील दुसरा तरुण नंदू मोरे यांनी टपाल खात्यात अनेक वर्ष सेवा देत असतांना टपाल खात्याच्या वेळोवेळी होणाऱ्या परिक्षेत यश संपादन करून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. त्याअनुषंगाने भारतीय टपाल खात्याच्या औरंगाबाद मुख्य कार्यालयात बढती झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी मान्यवरांनी आप आपल्या भाषणात दोघांचे अभिनंदन करून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संजय पाटील निकम, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय पा.निकम(मा.सभापती), आनंद निकम(उपसभापती), बाळा पाटील जाधव (रा. काँ.पार्टी जिल्हा उपाधयक्ष), निलेश केळे साहेब (सपोनि शिऊर पोलीस ठाणे),अजय पाटील साळुंके(हिं.ज.सेना), दौलत आण्णा निकम (भाजपा तालुका उपाध्यक्ष), दिलीप निकम(सरपंच), सुजित रंधे, बाबासाहेब ठेंगडे (नि.पोलीस हवालदार),विलास झालटे, अनिल मोईम, रावण निकम (पोलीस पाटील), ज्ञानेश्वर गोरे(ग्रा.सदस्य),गोरख गोरे, रमेश जाधव, गोरख झालटे,रमेश निकम, मच्छिंद्र निकम, शेळके दादा.पत्रकार हसन सैय्यद, पत्रकार राहूल आहेर, पत्रकार तैमूर सैय्यद, कैलास गोरे, काकासाहेब सोनवणे, केशव गोरे,भीमा आप्पा मोरे, अभिषेक गोरे, आकाश गोरे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.