राजेंद्र पाटील राऊत
नवयुवक गणेश मंडळ धनज च्या वत्तीने गावातील विद्यार्थ्यांना मोफत वही – पेन वाटप..
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
▶️ नवयुवक गणेश मंडळांच्या कौतुकास्पद उपक्रमाचे तालुक्यातील विविध स्तरांतील मान्यवरांनी केले अभिनंदन.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
देशासह संपूर्ण जगभर कोरोनाने महामारीने थैमान घातले असता कोरोनाचा संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने देशातील शाळा,महाविद्यालये बंद करून देशात सर्वत्र आँनलाईन शिक्षण प्रणालीत राबवली जात आहे.मात्र खेढ्या – पाठ्यातील गावातील सर्वच विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षण घेणं तांत्रिक दृष्ट्या परवडणारी गोष्ट नसल्याने अनेक विद्यार्थी शालेय अभ्यासा पासुन वंचित राहत होते.हि गंभीर बाब लक्षात घेऊन धनज येथील युवकांनी पुढाकार घेऊन शाळेपासुन गेल्या दोन वर्षांपासून दुर असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात वही देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी नवयुवक गणेश मंडळ धनज व युवा सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी युवक स्वप्निल गोपाळराव पाटील बोडके, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष बळवंत पाटील बोडके, तिरुपती तुकाराम पा.बोडके, युवा नेतृत्व ओमकार उत्तमराव पाटील,विठ्ठल तेजेराव पा बोडके यांच्या सह नवयुवक गणेश मंडळांने स्तुतीपुर्ण उपक्रम हाती घेऊन गावातील विद्यार्थ्यांना मोफत वही-पेन वाटप करून जिल्ह्यातील गणेश मंडळा समोर नवाआदर्श निर्माण केलेला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी डॉ. गोपाळराव पा.मुकदम हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तंटामुक्तीचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी पा.दरोडे उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय पा. बोडके,बालाजी पा.बोडके,माधव अशोक पाटील,गिरिधर शेषेराव बोडके,सोनू दिलीप पा. बोडके यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवक, सामाजिक कार्यकर्ते व नवयुवक गणेश मंडळाचे सर्व स्वयंसेवक, गणेश मंडळांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.