राजेंद्र पाटील राऊत
जाहुर परिसरात पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात मा.आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.
तात्काळ मदतीची अपेक्षा.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहूर परिसरात मा. आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांनी गेल्या तीन चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडुन शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाने खरडुन जाऊन उडीद, सोयाबीन, कापुस, तुर यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार हक्काचं भरीव पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे साहेबांनी सांगितले.उंद्री प.दे. येथे नाल्याला पुर येऊन कमलाकर दत्तात्रय गडाळे हा 15 वर्षांचा मुलगा पाण्यात वाहुन त्याचा दुर्दैवी अंत झाला त्याचा कुटुंबाची सांत्वन केले. शेतकऱ्यांचे भेट घेऊन आधार दिला. यावेळी नायब तहसिलदार महेश हांडे सर ,तलाठी कृषी सहायक, राजनजी देशपांडे,माधवराव पाटील उंद्रीकर ,नामदेव पाटील जाहुरकर,जेई जनार्दन पाटील, शंकरराव पाटील नंदगावकर,हाणमंतराव पा लोणाळकर,किरण पाटील बोडके, आकाश पा उंद्रीकर, दुर्योधन पा बोडके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनिताताई राजुरकर,मारोती पा मटके, शिवाजी पंदनवाड, गोपाळ पा बिरादार,शेख फेरोज,उमेश सोनकांबळे,गावातील शेतकरी सरपंच प्र सुधाकर गन्लेवार नारायण पा वडजे,हाणमंत गन्लेवार, अच्युत पा सुर्यवंशी काशिनाथ देसाई,रवि देसाई,दयानंद कांबळे,सुरज कोत्तावाड,,राजु वाघमारे सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.