Home माझं गाव माझं गा-हाणं पालघर मधील आरोग्य विभागाचा खेळखंडोबा ; गरोदर महिलेचा खाजगी रुग्णवाहिकेतच मृत्यू.

पालघर मधील आरोग्य विभागाचा खेळखंडोबा ; गरोदर महिलेचा खाजगी रुग्णवाहिकेतच मृत्यू.

225

राजेंद्र पाटील राऊत

पालघर मधील आरोग्य विभागाचा खेळखंडोबा ; गरोदर महिलेचा खाजगी रुग्णवाहिकेतच मृत्यू.

(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
पालघर,दि.13:– पालघर मध्ये आरोग्य विभागाचा पुन्हा एकदा बोजवारा उघड झाला आहे.विक्रमगड शासकीय रुग्णालयात उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने 23 वर्षीय गरोदर महिलेचा खाजगी रुग्णावाहिकेत मृत्यू झाल्याची घटना दि.11 सप्टेंबर रोजी घडली आहे.
ज्योती ज्ञानेश्वर भोईर असे मृत गरोदर महिलेचे नावं आहे.ज्योती ही मूळची पालघर जिल्ह्यातील सावरा -एबूर येथील रहिवाशी असून ती विक्रमगड ( चिखलपाडा ) येथे माहेरी आली होती. ती गरोदर असल्याने प्रसूती वेदना होत असल्याने तिला विक्रमगड येथे शासकीय रुग्णालयात दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास दाखल केले होते.
ग्रामीण रुग्णालयात स्त्री व बालरोग तज्ञ उपलब्ध नसल्याने गरोदर मातेला डहाणू येथील रुग्णालयात हलवण्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मात्र डहाणू येथे जात असताना अर्ध्या रस्त्यातच गरोदर महिलेचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात केले असताना ही डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांच्या खाजगी रुग्ण वाहिका देऊन त्यांच्या कडून रुग्णवाहिकेचे भाडे घेतले.
शासकीय रुग्ण वाहिका उपलब्ध असताना देखील चालक नसल्याचे कारण देत रुग्ण वाहिका दिली गेली नसल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा आरोप केला आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाची उदासीनता पुन्हा एकदा पुढे आली आहे, काही महिन्यापूर्वी विक्रमगड मतदार संघांचे आमदार सुनिल भुसारा साहेब यांची विक्रमगड मतदार संघात मोठया प्रमाणात मोफत रुग्ण वाहिका दिल्या आहेत.