राजेंद्र पाटील राऊत
देगलूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्या. -भागवत पाटील सोमुरकर शिवसेना मीडिया तालुकाप्रमुख देगलूर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यात तसेच परिसरात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः वाहून गेले. देगलूर तालुक्यातील खानापूर सर्कल, मरखेल सर्कल, शहापूर सर्कल, हाणेगाव सर्कल, करडखेड सर्कलमध्ये मागील दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके अक्षरशः वाहून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. देगलूर तालुक्यातील सर्व पिकांचे १००% नुकसान झाले असून सदरील पिकांची पाहणी तसेच पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पिक विमा मंजूर करावा. मुसळधार पावसाने ग्रामीण भागांतील घरांची पडझड झाली असून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालक मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना शिवसेना मीडिया तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर यांनी दिले.