Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणेत स्वर्गिय तुकाराम भाऊ पवार यांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न

व-हाणेत स्वर्गिय तुकाराम भाऊ पवार यांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न

199
0

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणेत स्वर्गिय तुकाराम भाऊ पवार यांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न
(विशाल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
जळगांव (नि.)- व-हाणे,ता.मालेगांव गावचे भुमिपुत्र व लोकनेते स्वर्गिय तुकाराम भाऊ शंकर पवार यांची पुण्यतिथी काल (दि.७ सप्टेंबर ) रोजी मोठया उत्साहात संपन्न झाली.
स्वर्गिय तुकाराम भाऊ पवार हे व-हाणे गावचे रहिवाशी होते.त्यांना पैलवान या नावानेच सर्वदुरपर्यत ओळख होती.तुकाराम भाऊ पवार यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा व-हाणे गावाच्या सरपंचपदापासून केला होता.अनेक संस्थामध्ये विविध पदे भुषविली होती.मालेगांव तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही तुकाराम भाऊ पवार यांनी सांभाळलेले होते.त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकविध विकासाची कामे केलीत.त्यांचे सामाजिक अध्यात्मिक कार्यातील योगदानही मोलाचे ठरले आहे,आज तुकाराम भाऊ पवार यांच्या कारकिर्दीचा विकासात्मक आढावा व-हाणेत वेगवेगळ्या झालेल्या विकासकामांच्या स्वरुपात बघावयास मिळत आहे.
काल दि.७ सप्टेंबर रोजी तुकाराम भाऊ पवार यांच्या २७ व्या स्मृतीदिना निमित त्यांच्या कारकिर्दीतील स्मृतीना उजाळा देत पुण्यतिथी कार्यक्रम मोठया उत्साहात व-हाणे येथील समाधीस्थळाजवळ पार पडला.यावेळी व-हाणे ग्रामस्थांसह स्वर्गिय तुकाराम भाऊ पवार यांच्या परिवारातील सगळेच सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here