राजेंद्र पाटील राऊत
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यातील शेत पिकाचे नुकसान व गावातील घरी पडले तत्काळ पंचनामे करा.
छावा छात्रवीर सेना नांदेड जिल्हा प्रमुख अच्युत पाटील उंद्रीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील गेल्या पंधरा दिवसापासून आज पर्यंत सतत पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील देगलूर तालुक्यातील शेतीच्या पिकाचे सोयाबीन. कापूस तूर पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून तसेच उडीत काढलेले ठिकाणी गोळा करत असताना पाणी जाऊन वाहून गेली त्यामुळे शेतकरी कोलमडला आहे तसेच अतिवृष्टी व कोरोना दुहेरी संकट उभे राहिले म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी अशा परिस्थितीमध्ये शेतक-यांच्या पाठीशी उभे राहावे लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून त्यात त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळवून द्यावेत अशा पद्धतीची मागणी व पीक विमा ऑनलाईन ची पद्धत बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे अजून जास्त नुकसान होत आहे तरी ते तरी चालू करावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली नाही झाल्यास छावा क्षात्रवीर सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला
नांदेड जिल्हा प्रमुख अच्युत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले.