राजेंद्र पाटील राऊत
सर्पमित्रांचा सत्कार (युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पत्रकार संघ देवळा तालुक्याच्या वतीने सर्प मित्र गोरख ठाकरे यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला.गोरख ठाकरे हे दहीवड गावचे रहिवासी आहेत ते दोन ते तीन वर्षांपासून सर्प पकडून ते सुरक्षित ठिकाणी सोडत असे.आतापर्यंत 100/150 सर्प पकडले आहेत.एकाच दिवशी दहा कोब्रा जातीचे सर्प विहिरीतून पकडून त्यांना जीवदान दिले, एक प्रकारे त्यांनी रेकॉर्ड बनवले आहे.गोरख ठाकरे हे शेती करून समाजसेवा करतात.त्यांनी आतापर्यंत मोफत (विनामूल्य)सेवा केली आहे.शासनाकडून त्यांना योग्य मानधन देण्यात यावे व सर्प पकडण्यासाठी लागणारे साहित्य मिळावे .असे पत्रकार संघाचे वतीने आश्र्वासन देण्यात आले.यावेळी युवा मराठा न्यूज चे युवराज देवरे, तालुका अध्यक्ष महेश सोनकुळे,उपाध्यक्ष शुभानंद देवरे, कार्याध्यक्ष नितिन शेवाळकर, जिल्हा संपर्क प्रमुक बाबा पवार, सदस्य विष्णू जाधव,तसेच वैभव पवार, सोपान सोनवणे, जगदिश निकम आदी उपस्थित होते.