पालघरमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन.
वैभव पाटिल विभागीय संपादक
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे कृषी विभागाचे आवाहन.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाने पालघर येथे 15 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दादाजी भुसे कृषी व राज्याचे कृषी मंत्री यांचे हस्ते होईल या कार्यक्रमास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ आणि जिल्हा परिषद अध्यक्षा उपस्थित राहणार आहेत. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पालघर यांच्या वतीने पालघर येथील हुतात्मा स्मारक मैदानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध रानभाज्या उपलब्ध असणार आहेत. रानभाजी आणि औषधी गुणधर्म रानभाजी पाककृती आदीची माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या आळु, कंटोळी,अंबाडी, शिंद,शेवगा, टाकळा, दिंडा अशा विविध रानभाज्या आणि विविध प्रकारच्या भाज्या सहर्ष शेतकरी या महोत्सवात भाज्यांची मांडणी विक्रीसाठी करणार आहे.
रोजच्या आहारात रानभाज्या महत्त्व वाढावे या करिता महाराष्ट्र शासन कृषी विभाग जन जागृती अभियान राबविणार आहे.