Home विदर्भ स्टेजवरच सर्वांसमोर अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका 🛑

स्टेजवरच सर्वांसमोर अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका 🛑

229
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 स्टेजवरच सर्वांसमोर अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका 🛑
✍️ अकोला 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अकोला :⭕ हिंगणा येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदर अमोल मिटकरी यांना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. यानंतर मिटकरी यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असूून सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्षा महागायिका वैशाली माडे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते.

अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही छक्कड गायला सुरुवात केली.

मात्र, काही क्षणातंच मिटकरी यांचे तोंड वाकडे होऊ लागले, आवजामध्ये बदल होऊ लागला. मिटकरी यांच्या प्रकृतीत झालेला बदल उपस्थितांच्या लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मिटकरी यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

“माझ्या प्रकृतीत सुधारणा आहे. चिंता करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. आपले जीव धोक्यात घालून भेटायला येवू नये,” अशी विनंती देखील मिटकरी यांनी केली आहे.⭕

Previous articleजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाचा पीक विमा भरावा. -खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
Next article🛑 ”मराठा सिर्फ दो ही बात जानता है मारना या मरना ” ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here